Pimpri: कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘पान टप-या’ बंद करा; राष्ट्रवादी युवतीची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू संसर्गजन्य आहे. नागरिक ‘पान टपरी’वर गोवा, गुटखा, पान या गोष्टींचे सेवन करत त्याच ठिकाणी थुंकतात. त्यामध्ये जर कोणी बाधित असेल किंवा कोणाला काही आजार असेल. तर, यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यापार्श्वभुमीवर कोरोनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील ‘पान टप-या’ काही दिवस बंद कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ज्या ज्या ठिकाणी “पान टपरी” आहेत. तिथे गोवा, गुटखा, सिगारेट, पान या गोष्टींचे नागरिक सेवन करतात. त्यामुळे याचठिकाणी अधिकचे धुम्रपान होते. गोवा, गुटखा व पान खाल्ल्यानंतर लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. “कोरोना व्हायरस” हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे जर कोणी बाधित असेल किंवा कोणाला काही आजार असेल. तर, यामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील पान टपऱ्या काही दिवस बंद करण्यात याव्यात. अन्न पुरवठा विभागातर्फे विशेष पथक नेमूण तशी यंत्रणा राबवावी. जे पान टपरी धारक “पान टपरी बंद” करणार नाहीत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, नगरसेविका अनुराधा गोफणे, ‍निकिता कदम, सुलक्षणा शिलवंत, सुमन पवळे, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्षा गंगा धेंडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.