Pimpri: शहरातील 128 कोरोना संशयितांचे ‘रिपोर्ट निगेटीव्ह’

एमपीसी न्यूज – कोरोनाचे संशयित म्हणून महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या तब्बल 128 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुसरीकडे 126 नवीन कोरोना संशयित रुग्ण आज (शुक्रवारी) महापालिका रुग्णालयात दाखल झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी पन्नाशी ओलांडली आहे. आजपर्यंत शहरातील 52 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, दुसरीकडे अनेकांचे रिपोर्ट निगेटीव्ह देखील येत आहेत. आज आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 13 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही समाधानाची बाब आहे. तर, एकाचा मृत्यू झाला आहे.

  • आजचा वैद्यकीय अहवाल!
    #दाखल झालेले संशयित रुग्ण – 126
    # पॉझिटीव्ह रुग्ण – 00
    #निगेटीव्ह रुग्ण – 128
    #चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 93
    #रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 128
    #डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 128
    #आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 52
    # सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 38
    #वायसीएममध्ये 34 तर पुण्यात चार जणांवर उपचार सुरु
    # आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 1
    #आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 13
    # दैनंदिन भेट दिलेली घरे – 16399
    #दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 49322

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.