Pimpri : श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी विचार मंचच्या वतीने सदाशिव खाडे यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – मागील पाच वर्षात सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारच्या सत्ता काळात केवळ साडेचार वर्षात आणि प्राधिकरण अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्त करण्यात आली. त्यानंतर केवळ सात ते आठ महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे आणि शहरातील तीनही आमदार यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत हा प्रश्न मार्गी लागला आणि पिंपरी चिंचवड शहरातील बाधित शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांचा सत्कार श्रध्येय अटलबिहारी वाजपेयी विचार मंच पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने करण्यात आला.

त्याचबरोबर प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे अधिकृत करण्याचा देखील निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सुमारे दीड लाख नागरिकांना सुध्दा या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या दोन्ही निर्णयाचे उस्फुर्त स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी केले आहे.

  • यावेळी नगरसेवक माऊली थोरात, रवी लांडगे, उत्तम केंदळे, माजी नगरसेवक भिमा बोबडे, प्रमोद ताम्हणकर, भाजपा सरचिटणीस प्रकाश जवळकर, शेखरभाऊ लांडगे, दीपक कुलकर्णी, अजय पाताडे, गणेश चव्हाण, नंदू भोगले, सुरेश पाटील, दिलीप गोसावी, योगेश भागवत, कैलास सानप, आदित्य कुलकर्णी, गणेश ढाकणे, संजय ओव्हाळ, देवदत्त लांडे, प्रकाश हगवणे, सुधाकर काळे, गणेश ढाकणे, कोमल शिंदे, सारिका चव्हाण आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते .

गेली अनेक वर्षांपासुन पिंपरी-चिंचवड शहरात राहत असणारे प्राधिकरण हद्दीतील शेतकरी यांचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा प्रश्न गेली 40 वर्षांपासून प्रलंबित पडला होता. मागील 35 वर्षे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या हाती सत्ता असताना देखील अत्यंत महत्वाचा प्रश्न असुन देखील तो सोडविण्यात त्यांना व त्यांच्या तात्कालीन लोकप्रतिनिधींना यश आले नाही.

  • पिंपरी-चिंचवड करांचे नवनगर विकास प्राधिकारणाशी संबंधित अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न मुख्यमंत्री यांच्या माध्यमातुन सोडविल्या बद्दल व ज्यांच्या कार्यकालात हे अत्यंत महत्वाचे प्रश्न सुटले असे प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून सदाशिव खाडे यांचा हा सत्कार पिंपरी चिंचवड शहराचे उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरेश्वर शेडगे यांनी केले. राजू दुर्गे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.