Pimpri : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – स्री शिक्षणाचा पाया रचून स्त्रियांना स्वाक्षर करुन आत्मनिर्भर (Pimpri)बनवण्यासाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणच्या प्रणेत्या होत्या, शिक्षण तसेच साक्षरता क्षेत्रात महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न महत्वपूर्ण असल्याचे मत आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व महिला भगिनींना शुभेच्छाही दिल्या.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (Pimpri)यांची जयंती, महिला शिक्षण दिन आणि विचार प्रबोधन पर्व उत्साहात साजरा करण्यात आला. महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस आयुक्त शेखर सिंह यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आंतरराष्ट्रीय किर्तीचे रांगोळीकार सोमनाथ भोंगळे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासह साकारलेल्या मान्यवर महिलांच्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटनही आयुक्त सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी नगरसदस्य मारुती भापकर, उप आयुक्त मनोज लोणकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, विनोद जळक, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता कविता माने, कार्यालय अधिक्षक मिनाक्षी गरुड, उपलेखापाल गीता धंगेकर, दिपाली कर्णे, मुख्य लिपिक विजया कांबळे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी मोशीतील महापालिका शाळेच्या आवारातील तसेच पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारकातील त्यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मोशी येथे झालेल्या कार्यक्रमास इ प्रभागाचे प्रशासन अधिकारी नानासाहेब मोरे, आरोग्य निरीक्षक अमित पिसे, गट प्रमुख किरण गव्हाणे, विकास काळजे, राहुल चावरिया, पुनम घुमटकर, वनिता क्षीरसागर तसेच महिला बचत गटाच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रबोधन एकदिवसीय पर्वाचे आयोजन पिंपरी येथील यांच्या स्मारकात करण्यात आले होते त्याचे उद्घाटन अतिरिक्त उल्हास जगताप यांनी केले.

या विचार प्रबोधन पर्वास माजी नगरसदस्य अंकुश कानडी, मारुती भापकर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, आण्णा कुदळे, बी.बी.शिंदे, कुणाल वाव्हळकर, संजय बनसोडे, मनोज गरबडे, सुरेश गायकवाड, प्रकाश डोळस, शंकर लोंढे आकाश इजगज, मनोज गजभार, राहुल सोनवणे, माऊली बोराटे, बाळासाहेब भागवत तसेच महिला सामाजिक कार्यकर्त्या वंदना जाधव, अॅड. विद्या शिंदे, कविता खराडे आदी उपस्थित होत्या.या कार्यक्रमात समाज विकास विभागाच्या वतीने केलेल्या सर्वेक्षणात उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या बचत गटाच्या अध्यक्षांचा सत्कार अतिरिक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

Railway : पुणे रेल्वे विभागात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

शिलाई युनिट व शेवया बनवणे या उद्योगांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पद्मजा महिला बचत गटाच्या परवीण कोरबू यांचा, हॉटेलमध्ये प्रतिदिन 200 किलो लसूण पुरवणे याबाबत सिद्धी महिला बचत गटाच्या रूपाली मिसाळ यांचा, बेकरी उत्पादने तयार करण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नालंदा महिला बचत गटाच्या सुलक्षणा कुरणे यांचा, शोभेच्या पणत्या बनवणे याबाबत प्रगती महिला व्यवसाय गटाच्या सुजाता निकाळजे यांचा, फरसाण बनवणे व होलसेल भावाने विक्री करणे यासाठी एकता महिला बचत गटाच्या एकता जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच नवी दिशा पहिला क्रमांक मिळवणाऱ्या नवी देशा महिला मंडळाच्या निर्मला नटवाल यांचा तर दुसरा क्रमांक विजेत्या प्रेरणा महिला बचत गटाच्या सुरेखा दौडमणी यांचा तर तिसरा क्रमांक विजेत्या विदेशा महिला बचत गटाच्या सुनीता गायकवाड यांचाही सत्कार करण्यात आला.

शिलाई युनिट मधील कोविड योद्धा महिला बचत गटाच्या सुवर्णा भालेराव यांचाही सत्कार करण्यात आला तर जेष्ठ पत्रकार व लेखक शिवाजीराव शिर्के यांचा महासम्राज्ञी येसूबाई साहेब या ग्रंथाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मेघना झुझम यांनी “मी तुमची सावित्रीबाई फुले” हा एकपात्री नाट्य प्रयोग सादर केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.