Railway : पुणे रेल्वे विभागात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

एमपीसी न्यूज – क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची 194 वी जयंती बुधवारी (दि. 3) पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (Railway) कार्यालयात साजरी करण्यात आली.

यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दू दुबे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन व दीपप्रज्वलन केले. अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांनीही त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे द्वारा स्त्री शिक्षणाबाबत केलेल्या कार्याबाबत संबोधित केले. त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी जितेंद्रप्रताप सिंह यांच्यासहित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Pune : पीएमआरडीएच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतले तणावमुक्त जीवनाचे धडे

ऑल इंडिया रेल्वे एम्प्लॉईज ओबीसी असोसिएशनचे माजी सरचिटणीस पी. व्ही. माळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश रंजन तर आभार (Railway) जयवंत भुजबळ यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.