Pimpri: शहरातील खासगी डॉक्टर, नर्स यांनी कोरोना लढ्यात पालिकेला साथ द्यावी; आयुक्तांचे आवाहन

corona Fight privat Docter Nurses support to municipality pcmc commissioner appeal

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची साथ झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने ऑक्सीजन आणि आयसीयू बेड निर्माण करावे लागणार आहेत. या बेडचे संचलन करण्यासाठी शहरातील खासगी डॉक्टर, नर्सची नितांत आवश्यकता आहे. त्यांनी पालिकेकडे यावे. कोरोना विरोधातील लढ्यात पालिकेला साथ द्यावी, असे कळकळीचे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची साथ झपाट्याने वाढत आहे. दिवसाला सहाशे ते सातशे नवीन रुग्णांची भर पडत आहे. श्वासनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी फेसबुक लाईव्हद्वारे शहरातील डॉक्टर, नर्सला पालिकेत सेवा करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

आयुक्त हर्डीकर म्हणतात, शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यासाठी मोठ्या संख्येने ऑक्सीजन आणि आयसीयू बेड निर्माण करावे लागणार आहेत. या बेडचे संचलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर, नर्सची आवश्यकता पडत आहे.

त्यासाठी शहरात राहणा-या सर्व खासगी वैद्यकीय सराव करणारे एमडी, एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस या डॉक्टरांची पिंपरी पालिकेला अत्यंत नितांत आवश्यकता आहे.  तरुण डॉक्टरांनी या अडचणीच्या कालावधीत पालिकेला साथ द्यावी.

कोरोना लढ्यात मदत करण्यासाठी आमच्याकडे यावे. त्यांना रितसर अपॉइमेंट केले जाईल. त्यांनी कोरोना काळापुरती विविध केंद्रावर नियुक्ती केली जाईल.

शहरातील तरुण डॉक्टर या आवाहनाला साद देतील. वायसीएम रुग्णालयासह कोविडच्या इतर रुग्णालयात रुजू होतील. डॉक्टरांची कमतरता भरुन काढण्यासाठी मदत करतील, असा विश्वासही आयुक्त हर्डीकर यांनी व्यक्त केला.

त्यासोबतच शहरात अनेक नर्सेस आहेत. त्या प्रशिक्षित आहेत. अनेकांना कामाची गरज आहे. त्यांनीही पालिकेशी संपर्क साधावा. कोरोना विरोधातील लढ्यात पालिकेला साथ द्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.