Pimpri : पुरात अडकलेल्यांची बाहेर पडण्याची धडपड आणि बघ्यांची गर्दी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. पुराचे पाणी पाहण्यासाठी चारचाकी आणि दुचाकी घेऊन आलेल्या हजारो सेल्फी इच्छुक नागरिकांमुळे रहाटणी, चिंचवड, रावेत भागात वाहतुकीची पुरती दैना उडाली.

आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सुदैवाने नागरिक पूर बघण्यासाठी बाहेर पडले. पुराचे पाणी पाहण्यासाठी दुपारपासूनच नागरिकांचा ओघ वाढला. सेल्फी, फोटो घेण्यासाठी अनेक वाहनचालक चारचाकी तसेच दुचाकी घेऊनच पुलावर थांबले होते. पुलावर सेफी काढणाऱ्यांची संख्या वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. भागांमध्ये पाणी साचून अनेकांच्या घरातही पाणी शिरले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने जगबुडी नदी पाठोपाठ आता आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीतही प्रचंड वाढ झाली असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.

  • रिव्हर रोड, चिंचवड, पिंपळे सौदागर येथील नदीचे दुथडी भरुन वाहणारे पाणी पहण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी पुलांवर गर्दी केलीी होती. सांगवीत ५० झोपड्यांमध्ये रविवारी पहाटे पाणी शिरले. वेताळनगरमधील एका उद्यानांतून एका सुरक्षारक्षकाच्या कुटुंबाची पाण्यातून अग्रिनशामक दलाकडून सुटका करण्यात आली. तर, भाटनगर भागातील ७५ कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले. कासारवाडी, दापोडी येथील नदीपात्रालगत पाणी शिरल्याने नागरिकांची दैना उडाली.

तर, पिंपळे सौदागर, रहाटणी येथील परिसरातील नदीकाठच्या नागरिकांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कन्या मुले क्रमांक ५५ याठिकाणी ३०० कुटुंबाना हलविण्यात आले आहे.

  • यावेळी नगरसेवक चंद्रकांत नखाते, सुनीता तापकीर, निर्मला कुटे, राज तापकीर, शुभम नखाते यांनी पाहणी केली. कासारवाडी दापोडी याठिकाणी नदीपात्रातील पाणी वाढल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे युवानेते शेखर ओव्हाळ यांनी स्वतः जाऊन पाहणी केली आणि लोकांची विचारपूस केली. पिंपरी युवासेना धावली मदतीला सध्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे फुगेवाडी येथील नदीकाठच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने बहुतांश लोकांना फुगेवाडी येथील कै.मीनाताई बाळासाहेब ठाकरे या शाळेमध्ये हलवण्यात आले.

तसेच त्यांना युवासेना पिंपरी विधानसभा आणि मनोज वाखारे यांच्या वतीने अल्पोहार देण्यात आला. तसेच सकाळपासून प्रशासनाने त्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केले आहे, म्हूणन प्रशासनचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी पिंपरी विधानसभेचे संघटक निलेश हाके, मनोज वाखारे, अविनाश जाधव, रुपेश फुगे, विकास गायकवाड, बाबू देवकर आदी उपस्थित होते.

  • पिंपरी गावातील नदीकाठच्या घरात पुराचे पाणी, जनजीवन विस्कळीत झाल्याने येथील नगरिकांच्या मदतीसाठी ऋषिकेश संजोग वाघेरे पाटील यांनी नवमहाराष्ट्र विद्यालय येथे राहण्यासाठी सोयकरून दिली.तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली प्रभागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच आपल्या मदतीसाठी हेल्पलाईन नंबर 9822000304- ऋषिकेश वाघेरे यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.