Pimpri: महापालिका संवाद रथाच्या माध्यमातून घेणार नागरिकांच्या समस्या जाणून

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरी विकास प्रकल्पांमध्ये नागरिकांना प्रभावीपणे सामील करून घेण्याच्या उद्देशाने आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेवून सोडविण्यासाठी संवाद रथ तयार करण्यात आला आहे. संवाद रथाच्या माध्यमातून समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत.

सीईआरच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या संवाद रथाचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले. स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेविका आशा शेडगे, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक अशोक भालकर उपस्थित होते.

महापालिकेच्या गरजेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यशाळेच्या वाहनातून प्लस ट्रकची रचना करण्यात आली आहे. हे रीमॉडेलिंग फिनिक्स मार्केटसिटी,पुणे यांच्या सीईआर यांच्याकडून मिळालेल्या 17 लाख रुपयांच्या मदतीने करण्यात आले आहे. या रथामध्ये दोन सक्षम इंटरअॅक्टी आणि टच स्क्रिन आहेत. नागरिकांना सतत भेडसावणा-या अडचणींविषयी चर्चेकामी कार्य करणे हा या संवाद रथाचा उद्देश आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध सह-निर्मिती कार्यक्रमांत नागरिकांचा सहभाग घेणेकामी संवाद रथाचा उपयोग केला जाईल. ट्रकचा योग्य त-हेने वापर होण्यासाठी टीम पल्स एक प्रकल्प अहवाल तयार करणार असून याद्वारे नागरिकांना शहरी विकासात सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.