Pimpri: आज 587 नवीन रुग्णांची भर, 172 जणांना डिस्चार्ज; नऊ जणांचा मृत्यू

Today 587 new patients added, 172 discharged; Nine people died :आजपर्यंतची रुग्णसंख्या 6061 वर पोहोचली आहे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 568 आणि शहराबाहेरील 19 अशा 587 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक रुग्णवाढ आहेत. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 172 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आजपर्यंतची रुग्णसंख्या 6061 वर पोहोचली आहे.

आज एकाचदिवशी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. चिंचवड येथील 48 वर्षीय महिला, काळेवाडीतील 50 वर्षीय महिला, आकुर्डीतील 63 वर्षीय पुरुष, रहाटणीतील 62 वर्षीय वृद्ध, गांधीनगर येथील 38 वर्षीय महिला, पिंपरी येथील 51 वर्षीय व 59 वर्षीय पुरुष, आकुर्डीतील 70 वर्षीय वृद्ध, इंदुरीतील 65 वर्षीय पुरुष, पुण्यातील 65 वर्षीय महिला आणि विठ्ठलवाडीतील 67 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे.

शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णसंख्या सहा हजार पार झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे प्रमाण होण्याचे प्रमाणही जास्त आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

आज उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 172 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3681 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

शहरात आजपर्यंत 6061 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 3681 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 83 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 36 अशा 119 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 2265 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल !

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 1299

# पॉझिटीव्ह रुग्ण – 587

#निगेटीव्ह रुग्ण – 175

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 2378

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 2754

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 850

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 6061

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 2265

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 119

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 3681

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 20997

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 66974

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.