Pimpri : विविध कार्यक्रमातून गुरुंना वंदन करुन गुरुपौर्णिमा उत्साहात

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा गुरु माउली पुरस्काराने सन्मान करण्यात आला. गुरु पौर्णिमेनिमित्त शिवसेनेच्या चिंचवड विधानसभा युवती सेनेच्या वतीने हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. हा आगळा वेगळा उपक्रम यासाठी की संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच गुरुमाउली पुरस्कार हा या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना त्यांच्या मातेच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

माता ही आपली सर्व प्रथम गुरु असते. तिच्याच शिकवणीतून आपण आपले आयुष्य घडवीत असतो. आपण हा गुरुमाउली पुरस्कार गुरु पौर्णिमेनिमित्त मातेच्या हस्तेच प्रदान करण्याचे आयोजिले असे चिंचवड विधानसभा युवती सेनेच्या युवती अधिकारी शर्वरी जळमकर यांनी सांगितले.
या गुरुमाउली पुरस्कारात हा संगीत ठाकूर, डॉ. सोनिया सावंत, मुगदा देशपांडे, डॉ. विद्या देवरे, कुंदा भिसे, प्रिया बिरारी, संगीत खोचे, ऍड.उर्मिला काळभोर व लीना माने यांना या पुरस्काराने त्यांच्याच मातेच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमा वेळी आवर्जून सांगण्या सारखा क्षण म्हणजे एका पुरस्कार्थीला पुरस्कार प्रदान करिता त्यांची माता व त्यांची सासू एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून दोघांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड मावळ युवा सेना विस्तारक वैभव थोरात, चिंचवड युवा सेना अधिकारी विश्व्जीत बारणे, मनपा गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, अॅड वैभव थोरात महिला शहर प्रमुख ऍड. उर्मिला काळभोर, नगरसेविका निर्मला कुटे, मावळ युवा सेनेचे अनिकेत घुले, नांदेड संपर्क प्रमुख दीपक शेंडे, खडकवासला विधानसभा महिला आघाडी समन्वयक भावना थोरात, तसेच महिला आघाडी प्रमुख सरिता साने, लोणावळा जिल्हा युवती सेना अधिकारी दीपाली बिलारे, चिंचवड विधानसभा महिला आघाडी प्रमुख अनिता तुतारे, कामिनी मिश्रा, उषा अलर्ट, राकेश वाकुर्डे, विजय शिंदे, क्रांती शिंदे, सावली शिंदे, साक्षी, वंदना, प्रतीक, स्नेहल जोशी, प्रतीक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, स्वरुपा कापेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गुरु माउली पुरस्कार सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच एका आगळ्या–वेगळ्या व उल्लेखनीय पद्धतीने आयोजित केल्या बद्दल शहर प्रमुख योगेश बाबर, मनपा गटनेते राहुल कलाटे, महिला शहर प्रमुख ऍड. उर्मिला काळभोर तसेच वैभव थोरात यांनी भाषणात युवती सेना अधिकारी शर्वरी जळमकर यांचे भरभरून कौतुक केले. व सदर सोहळा हा प्रत्येक वर्षी शर्वरी जळमकर यांनी आयोजित करावे असेही प्रोत्साहन देत सांगितले. संचालन प्रसिद्ध संवाद दाता व दूरदर्शनचे संपादक कुणाल रेगे यांनी केले.

वाल्हेकर वाडी येथील प्रेरणा शाळा या ठिकाणी आमदार लक्ष्मण जगताप युवा मंचाच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ब प्रभाग समितीच्या अध्यक्षा करुणा चिंचवडे, ब प्रभाग समिती सदस्य विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, पोलीस वेलफेअर असोसिएशनचे गजानन चिंचवडे, भारतीय जनता पार्टीचे पाटीलबुबा चिंचवडे, हेमंत ननवरे, मनोज तोरडमल, डॉ. भालशंकर, सीताराम शिंदे,  प्रवीण नोला, मारुती दगडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक पवळे सर यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षक हा फक्त पुस्तकी ज्ञान न देता समाजामध्ये एक आदर्श व्यक्ती बनवण्याचे भारतीय संस्कृती शिकवण्याचे काम शिक्षक करत असतात समाजामध्ये एक आदर्श नागरिक बनवण्यासाठी शिक्षक समाजातील इतर घटकांनीही या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन सचिन शिवले यांनी केले. त्याचप्रमाणे सागर भोंडवे, प्रवीण वाल्हेकर, ऋषिकेश दिवटे, गणेश वाल्हेकर, अशोक भेगडे, यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन संदीप शिवले व मान्यवरांचे आभार वाल्मीक शिवले यांनी मानले.

बेटी बचाओ बेटी पढाओ या वाक्याला शोभेल अशी कामगिरी युवासेना पिंपरी विधानसभा व अनिकेत घुले मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना मदत करण्यात आली. कासारवाडीतील रहिवाशी किरण गायकवाड यांच्या तीन कन्या या गणेश इंग्लिश स्कूल दापोडी येथे शिकत आहे. 6 महिन्या पूर्वी झाल्येला अपघातमुळे गायकवाड कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला. त्यांना मुलींच्या शिक्षणाचा खर्च पेलवेना, गायकवाड कुटुंबीयांच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या तीन मुलींचा शिक्षणाचा खर्च युवासेना पिंपरी विधानसभा आणि अनिकेत घुले मित्र परिवार यांनी उचलला आणि चालू वर्षाच्या शिक्षणाचा धनादेश प्राचार्य घारे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, युवानेते गोपाळ मोरे, युवा शाखाधिकारी ओंकार जगदाळे, ॲड.अजित बोराडे, राहुल राठोड, उपविभाग संघटक सनी कड, रवि नगरकर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.