Pimpri : विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, कर्मचाऱ्यांना 25 हजार रुपये सानुग्रह अनुदान द्या -सतीश सोनटक्के

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या अभुतपूर्व संकटामुळे देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे सर्वच स्तरातील लोकांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना व कर्मचाऱ्यांचे वेतन अभावी हाल होत आहेत. त्यामुळे या शिक्षक कर्मचाऱ्यांना 25,000 रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष सतीश सोनटक्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

वेतनाअभावी शिक्षक, प्राध्यापक दैनंदिन अध्यापनाचे काम करून शेतकाम करणे, झेरॉक्स दुकान चालवणे, शिकावणी घेणे अशी कामे करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. लाॅकडाऊनमुळे हा पर्यायसुद्धा बंद झाल्यामुळे या शिक्षक कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या बिकट परिस्थितीची शासनाने दखल घ्यावी, अशी विनंती सतीश सोनटक्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यादरम्यान सरकारतर्फे विविध योजना राबवत गरिबांना मदत करण्यात आली. या आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीत विनाअनुदानित शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन अभावी प्रचंड हाल होत आहेत.

त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन या विनाअनुदानित घोषित अघोषित शिक्षकांना पंचवीस हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शिक्षण संघटनेचे अध्यक्ष सतीश सोनटक्के यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.