Pimpri Vaccination News : शुक्रवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’चे होणार लसीकरण; सलग दुस-या दिवशी कोविशील्डचा तुटवडा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी (दि. 24) फक्त कोव्हॅक्सिन’चे लसीकरण होणार आहे. कोविशील्ड लसीचा साठा उपलब्ध नसल्याने सलग दुसऱ्या दिवशी कोविशील्डचे लसीकरण करण्यात येणार नाही.

पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शुक्रवारी) ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

या ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार
ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, जुने जिजामाता रुग्णालय आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या 8 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.