Pimpri : खंडणीची मागणी करत दुकानाची तोडफोड, एकाला अटक

एमपीसी न्यूज – खंडणी स्वरुपात दुकानातील  (Pimpri) सामानाची मागणी करत दुकानाची दोघांनी तोडफोड केली आहे. पोलिसांनी यातील एकाला अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.13) पिंपरी येथे घडली आहे.

विकास भगवानदास माणिक (वय 40, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात याप्रकऱणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयुष्य कलेश्वर सरोदे (रा. पिंपरी) याला अटक केली असून त्याचा साथीदार कुणालवर ही गुन्हा दाखल केला आहे.

Bhosari : चक्क अंडा भुर्जी दिली नाही म्हणून व्यावसायिकाला लोखंडी रॉडने मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपरी येथे लाईट हाऊस नावाने दुकान आहे. आरोपी तेथे हातात हॉकी स्टीक व हातोडा घेऊन आले त्यांनी दुकानातील सामान देण्याची मागणी करत दुकानाची तोडफोड केली.

तसेच शिवीगाळ करत (Pimpri)  जिवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.