PCMC : पालिकेच्या रुग्णालयांत आयुर्वेदिक ओपीडी सुरु करा; आयुक्तांचा वैद्यकीय व्यावसायिकांशी संवाद

एमपीसी न्यूज – जैव वैद्यकीय घनकचरा जमा करण्यात (PCMC) येणाऱ्या अडचणींबाबत पास्को संस्थेशी पत्रव्यवहार करून कलेक्शन पॉइंटमध्ये वाढ करावी. जीपीएस प्रणालीचा वापर करणे शक्य आहे का हे तपासावे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व द्वितीय स्तर रुग्णालयांत आयुर्वेदिक ओपीडी सुरु करण्याची मागणी वैद्यकीय व्यावसायिकांनी पालिकेकडे केली.

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील जटील होत आहे. महापालिकेच्या वतीने रुग्णालये, दवाखाने या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात येत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, तज्ञ डॉक्टर, विविध सवलत योजना यामुळे नागरिकांकडून आरोग्य सेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना सर्वोत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या क्षेत्रील तज्ञांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत.

त्यासाठी शहरातील आरोग्यसेवेसंदर्भात आयुक्त शेखर सिंह यांनी वैद्यकीय व्यावसायिकांसमवेत संवाद साधला. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.

महापालिकेच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांवर चर्चा करण्यात आली. द्यकीय व्यावसायिकांनी आयुक्तांशी संवाद साधला. त्यांनी शहरातील आरोग्य सेवा, भविष्यातील वाटचाल, त्या संदर्भात आपली भूमिका, विविध अडचणी इत्यादी विषयांवर आपले विचार व्यक्त केले.

दवाखाने यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाशी चर्चा करून निर्णय घेणे. महाराष्ट्र प्रदूषण नियामक महामंडळ यांच्यासंदर्भात रुग्णालये यांनी एसटीपी कार्यान्वित करणे, पर्यावरण विभाग, एमपीसीबी व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची एकत्रित बैठक आयोजित करून चर्चेद्वारे निर्णय घेण्यात यावा. वैद्यकीय विभागामार्फत कॅटॅरक्ट शस्त्रक्रिया अहवाल ऑनलाईन पद्धतीने संकलित करण्यात यावे.

Asia Cup 2023 : आशिया कपमध्ये कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडची निवड; शिवम दुबे, रिंकू सिंह यांनाही संधी

याकामी गुगल शीट/ मोबाईल अॅप तयार करावे. जैव वैद्यकीय घनकचरा मासिक फीस ऑनलाईन पद्धतीने स्वीकारणे बाबत नव्याने कार्यान्वित ऑनलाईन हॉस्पिटल रजिस्ट्रेशन प्रणालीमध्ये योग्य ते बदल करून घेण्यात यावेत. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचेकरिता बहुउद्देशीय हॉल किंवा ऑफिस उपलब्ध (PCMC) करून द्यावा. महापालिका व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचा संवाद सुलभ व्हावा याकरिता व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करणेत यावा.

मनपा कर्मचारी यांचेकरीता भविष्यात इन्शुरन्स योजना सुरु करणेत आल्यास आयुष सेवा देणाऱ्या रुग्णालयांचा समावेश करणेबाबत इन्शुरन्स प्रोव्हायडर्स यांचेसमवेत चर्चा करून निर्णय घेनेत यावा. सर्व रुग्णालयांनी फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट करून घेऊन एनओसी अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

Pimpri : खंडणीची मागणी करत दुकानाची तोडफोड, एकाला अटक

याकामी नोंदणीकृत संस्थेकडूनच सदरचे ऑडिट करून घ्यावे. याकामी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणीकृत संस्थांची यादी प्रसिद्ध करणेत यावी. तसेच इमारतीचे स्ट्क्चररल ऑडिट करून घेणेत यावे. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना बोगस वैद्यकीय व्यावसायिक आढळून आलेस आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना माहिती कळविणेत यावी.

तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांनी झोनल रुग्णालायामार्फत योग्य ती कार्यवाही करावी. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचेकडून लसीकरण,कुटुंब कल्याण, नोटीफायेबल डिसीज ई. बाबतचे अहवाल वैद्यकीय विभागास सादर केले जातात. याकामी एचएमआयएस, आरसीएच पोर्टल व मासिक अहवाल फॉरमॅट तयार करणेत आलेले आहेत.

सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी सदरचे अहवाल वेळेत सादर करावेत तसेच अहवाल संकलित करणेत येणाऱ्या आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करावे. महानगरपालिका व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचा संवाद सुलभ व्हावा तसेच विविध प्रश्नांवर चर्चेतून तोडगा निघावा याकरिता खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, एमपीसीबी अधिकारी, पास्को अधिकारी व इतर संबंधित अधिकारी यांची एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात यावी अशा विविध मागण्या केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.