Pimpri : जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय (Pimpri) व संशोधन केंद्र, पिंपरी येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. परिचारिका आणि समाजसुधारक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांची जयंती जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरी केली जाते. त्यांना आभिवादन करून या कार्यक्रमाची सुरवात झाली. “आमच्या परिचारिका, आमचे भविष्य” हे यंदाचे घोषवाक्य होते. त्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र कुलपती डॉ भाग्यश्री पाटील, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांनी सर्वांना जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा देऊन परिचारिकांच्या कार्याचे कौतुक केले.

 

‘वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांची भूमिका फार महत्त्वाची आहे आणि त्या जबाबदारीने ही आरोग्य यंत्रणा सांभाळत असून अनेक आव्हानांना सामोरे जात, जीवाची बाजी लावत परिचारिकांनी रुग्णहित साध्य केले आहे ‘ असे मत कुलगुरू डॉ. एन. जे पवार यांनी व्यक्त केले.

 

दीपप्रज्वलन, प्रार्थना व मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांनी सर्वच परिचारिकाचे कौतुक केले व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘क्रिटिकल केअर नर्सिंग’ या माहिती (Pimpri) पुस्तिकेचे प्रकाशन झाले. रुग्णालयातील उत्कृष्ट योगदानासाठी परिचर्या उपसंचालिका लक्ष्मी प्रिया परिदा व परिचारिकांना यावेळी गौरविण्यात आले. केक कटींग करून हा आनंद सोहळा साजरा करण्यात आला.

तसेच या दिननिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये रांगोळी, पोस्टर, नृत्य, गायन, समूह नृत्य, संगीत खुर्ची आदींचे आयोजन करीत एकूण 380 हुन अधिक परिचारिकांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.

Pune : पुण्यात ऑनलाईन मनी ट्रान्सफर करणाऱ्या दुकानदरांना गंडा घालणारा अटकेत

 

या कार्यक्रमासाठी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरु डॉ एन जे पवार, शैक्षणिक संचालिका डॉ वत्सला स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमरजित सिंग, डॉ अर्जुन काकरानी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण, वैद्यकीय संचालक डॉ.अरुण कुमार रस्तोगी तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

आमच्या रुग्णालयात परिचारिकांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या अद्ययावत तंत्रज्ञानासह सर्व आवश्यक बाबी पूरक असल्यामुळे आम्हाला रुग्ण सेवा करताना खूप आनंद होतो तसेच आम्ही डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये काम करतो याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो अश्या भावना परिचारिकांनी व्यक्त केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.