Pimpri : वडिलांना चिडवल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भाऊ बहिणीला मारहाण

एमपीसी न्यूज – तीन तरुणांनी एका व्यक्तीला दारू पिण्यासाठी पैसे मागितले. तसेच त्या व्यक्तीला चिडवले. याचा जाब विचारण्यासाठी त्या व्यक्तीचा मुलगा आणि मुलगी गेले असता आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या दोन मित्रांना देखील मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 12) रात्री साडे सातच्या सुमारास लालटोपी नगर, मोरवाडी, पिंपरी येथे घडली.

याप्रकरणी अब्दुल अजीज चौधरी (वय 45, रा. लालटोपी नगर, मोरवाडी, पिंपरी) यांनी  पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल शेख (वय 19), समीर मुंशी शेख (वय 25), बाबन हनीफ शेख (वय 19, सर्व रा. लालटोपी नगर, मोरवाडी, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीस चौधरी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले आणि चौधरी यांना चिडवले. याचा जाब विचारण्यासाठी चौधरी यांची मुलगी शकाम आणि मुलगा शहजाद हे आरोपींकडे गेले. त्यावेळी आरोपींनी शकाम आणि शहजाद या दोघांना हाताने मारहाण केली.

तसेच शहजाद याचे मित्र अविनाश मासाळकर यांना लोखंडी कोयत्याने मारून जखमी केले. तर तय्यब अब्दुल चौधरी यांना लोखंडी पट्टीने मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.