Plastic Ban:प्लास्टिक बंदी स्वातंत्र्य चळवळ व्हावी –  डॉ. राजेश शेंडे 

एमपीसी न्युज:  पर्यावरणीय समस्यांवर मार्ग काढण्यासाठी शाश्वत पर्याय म्हणून केंद्र सरकारने सुरू केलेली प्लास्टिक बंदी ही आणखी एक स्वातंत्र्य चळवळ व्हावी, (Plastic Ban)विद्यार्थ्यांनी या चळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन पर्यावरणतज्ज्ञ आणि तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेश शेंडे यांनी केले.
आजपासून केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालयाच्या निर्णयानुसार 1 जुलैपासून प्लास्टिकबंदी लागू केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर जनजागृती करण्यासाठी मानवी साखळी केली होती. या वेळी राजेश शेंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  याप्रसंगी प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, उपप्राचार्या प्रा. स्वाती जोगळेकर, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, प्रा. रुपाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते.
डॉ. परदेशी म्हणाले, ‘2 ऑक्टोबर 2019 रोजी फर्ग्युसन महाविद्यालयात ‘सिंगल यूज प्लास्टिक फ्री कॅम्पस’ हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. तीन वर्षांनी ऑक्टोबर 2021 मध्ये तो यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला. त्यानुसार शंभर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि वस्तूंवर परिसरात बंदी आहे.(Plastic Ban) कॅरीबॅग, वस्तूंच्या सुरक्षेसाठी केले जाणारे प्लास्टिक पिशव्या, डिश, ग्लास, थर्माकॉलचा वापर केला जात नाही. दैनंदिन कचर्‍यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या वस्तूंना पर्याय ठरणार्‍या पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला जात आहेत.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.