Moshi : 13 वर्षीय मुलाचा डम्परच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज : अल्पवयीन (Moshi) मुलाला डम्परने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी डम्पर चालकास अटक केली आहे.

Pune Crime : बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

याबाबत कशिनाथ साठे (वय 46 वर्षे, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. आनंद केंद्रे (वय 44 वर्षे, रा. मु. पो. अबुलगा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. फिर्यादी यांचा मुलगा शंभो साठे (वय 13 वर्षे) हा रस्त्याच्या कडेने घरी जात असताना पिवळ्या-निळ्या रंगाच्या डम्परवरील चालक आरोपी त्याच्या ताब्यातील वाहन हयगयीने, बेजबाबदारपणे व वाहतुकीच्या नियमांकडे (Moshi) दुर्लक्ष करून भरदाव वेगाने चालवून फिर्यादी यांच्या मुलीस धडक दिली. त्या धडकेत शंभु साठे जखमी झाला व नंतर त्याचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.