CSK Squash tournament: स्क्वॉश स्पर्धेतील स्पर्धक उपांत्य फेरीत दाखल

एमपीसी न्युज: आयस्क्वॉश अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ 2022 खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेतील स्पर्धकांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.  साहील वाघमारे, बुरहान भानपुरावाला, फरीद अनद्राबी, देवांश अगरवाल, अनिका कलंकी, फाबिहा नफिसा, अर्णा दिवेशी आणि अनन्या गणशे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धां विरूध्द विजय मिळवत 11 वर्षाखालील गटामध्ये स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुंढवा येथील चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या 11 वर्षाखालील गटाच्या उपांत्यपुर्व फेरीमध्ये साहील वाघमारे याने अग्रमानांकित अक्क्षत सिंग याचा 11-9, 11-8, 11-7 असा सनसनाटी पराभव केला. बुरहान भानपुरावाला याने चौथ्या मानांकित वेदांत अगरवाल याचा 11-7, 7-11, 11-9, 11-7 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

अनिका कलंकी, फाबिहा नफिसा, अर्णा दिवेदी आणि अनन्या गणेश यांनी आपापल्या प्रतिस्पर्धां विरूध्द विजय मिळवत 11 वर्षाखालील गटामध्ये स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Manobodh by Priya Shende Part 67 : घनश्याम हा राम लावण्यरुपी

स्पर्धेचे संक्षिप्त निकालः उपांत्यपुर्व फेरीः 11 मुले वर्षाखालील फेरीः
साहील वाघमारे (महा) वि.वि. अक्क्षत सिंग (पश्‍चिम बंगाल, 1) 11-9, 11-8, 11-7
बुरहान भानपुरावाला (महा, 5) वि.वि. वेदांत अगरवाल (झारखंड, 4) 11-7, 7-11, 11-9, 11-7
फरीद अनद्राबी (राजस्थान, 3) वि.वि. आदित्य शहा (महा) 11-6, 11-3, 11-3
देवांश अगरवाल (झारखंड, 2) वि.वि. अयान धानुका (पश्‍चिम बंगाल) 3-11, 13-11, 11-2, 11-11;

उपांत्यपुर्व फेरीः 13 मुले वर्षाखालील फेरीः
हृदान शहा (महा, 1) वि.वि. अगस्त्या राजपुत (महा) 11-1, 11-5, 11-7;
सहर्ष शहारा (मध्यप्रदेश) वि.वि. कमलेश ढमढोरे (महा) 11-3, 11-7, 11-3;
लक्ष्मणा हरी (तामिळनाडू) वि.वि. अर्यमन सिंग (महा) 11-6, 12-10, 11-9;
श्रीनिथ सुभाष (तामिळनाडू, 2) वि.वि. आदित्य के. (तामिळनाडू) 11-3, 11-9, 11-5;

उपांत्यपुर्व फेरीः 11 मुली वर्षाखालील फेरीः
अनिका कलंकी (मध्यप्रदेश, 1) वि.वि. जेरूशा जे. (तामिळनाडू) 11-2, 11-2, 11-2;
फाबिहा नफिसा (उत्तरप्रदेश) वि.वि. सुधांजली यादव (महा) 11-2,11-0, 11-1;
अर्णा दिवेदी (हरयाणा) वि.वि. गार्गी कदम (महा) 11-5, 9-11- ११-5, 4-11, 11-9;
अनन्या गणेश (तामिळनाडू, 2) वि.वि. त्रिशा शहा (महा) 11-5, 11-1, 11-1;

उपांत्यपुर्व फेरीः 13 मुली वर्षाखालील फेरीः
आरीका मिश्रा (महा, 1) वि.वि. क्रसेजल मिरा (तामिळनाडू) 11-3, 11-2, 11-1;
ध्रिष्टी पवार (महा) वि.वि. अरोमा (उत्तरप्रदेश) 16-14,11-4, 12-10;
सानवी कलंकी (मध्यप्रदेश) वि.वि. वन्या गुप्ता (मध्यप्रदेश) 11-3, 11-8, 11-6;
काशवी मंगल (दिल्ली) वि.वि. आद्या बुधिया (झारखंड, 2) 11-8, 11-5, 10-12, 11-9;

पुरूष गटः चौथी फेरीः
जमाल साकिब (सव्हिसेस्, 1) वि.वि. अविनाश यादव (महा) 11-8, 11-7, 11-8;
आदर्श बोन्धा (मध्यप्रदेश) वि.वि. अभिषेक बोन्धा (मध्यप्रदेश) 10-12, 11-9, 11-5, 10-12, 2-3 रिटायर;
दिपक मंडल (महा) वि.वि. पार्थ अगरवाल (महा) 10-12, 7-11, 11-2, 11-5, 11-2;
नवीन जांग्रा (सव्हिसेस्) वि.वि. तनवीत मुंद्रा (मध्यप्रदेश) 11-4, 11-8, 12-10;
सुरज चंद (महा, 2) वि.वि. अखिलेश यादव (सव्हिसेस्) 11-6, 11-3, 11-3;

महिला गटः चौथी फेरीः
सुनिता पटेल (महा, 1) वि.वि. व्ह्योमिका खंडेलवाल (महा) 11-6,11-3, 11-4;
रथिका सिलन (तामिळनाडू, 2) वि.वि. आरीका मिश्रा (महा, 9) 9-11, 11-2, 11-2, 11-2;
आकांक्षा गुप्ता (महा) वि.वि. क्रिया सरवानन (तामिळनाडू) 11-0, 11-7, 11-2;
तनिष्क जैन (महा) वि.वि. नाव्या गुप्ता (उत्तरप्रदेश, 3) 11-10, 11-6, 11-13, 11-6;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.