Pune Crime : बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या साडेचार लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी

एमपीसी न्यूज : अज्ञात चोरट्याने 4.60 लाख (Pune Crime) रुपयांची सोन्याचे दागिने असलेली बॅग बसमध्ये चोरल्याची घटना घडली. हि घटना काल ३० जून रोजी घडली आहे. याबाबत 27 वर्षीय महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी 30 जूनला दुपारी स्वारगेट बस स्टॉप ते भक्ती शक्ती चौक असा पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत असताना ही चोरी झाली. प्रवास करताना अज्ञात चोरट्याने 2 लाख रुपये किंमतीचा 5 तोळे वजनाचा 4 पदरी सोन्याचा राणी हार, 1.20 लाख रुपये 3 तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस, 80,000 किंमतीचे 2 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व 60,000 रुपये किंमतीचे सोन्याच्या बांगड्या असा एकूण 4.60 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने भरलेली लाल रंगाच्या प्रवासी बॅगेत घेऊन फिर्यादी (Pune Crime) प्रवास करत होती. प्रवास करताना त्यांच्या नकळत चोरट्याने हि चोरी केली.

Pimpri Crime : चिटफंड चालकास 87.60 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकारणी केली अटक

अज्ञात चोरट्याविरोधात भा. द. वि. कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.