Pimpri News: शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरु

एमपीसी न्यूज –  शैक्षणिक (Pimpri News) वर्षात 2022-23 यासाठी इयत्ता 10 वी नंतर महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड येथील 250 शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश देण्याची प्रकिया सुरु करण्यात आली आहे. 

विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येणार असून, या ठिकाणी विनामुल्य निवासव्यवस्था,
अंथरूण-पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी इतर शैक्षणिक बाबींकरिता आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहे.

Property Tax : ऑनलाइन कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना सामान्यकरात 30 सप्टेंबरपर्यंत 4 टक्के सवलत मिळणार

इच्छुक विद्यार्थ्यांना वसतिगृहात (Pimpri News) मोफत प्रवेश देण्यात येणार असून प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत. वसतिगृहातून प्रवेश अर्ज घेवून जाण्याचे आवाहन शासकीय मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या गृहप्रमुखानी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.