Pimpri Corona Update: शहरात आज 179 नवीन रुग्णांची नोंद; 121 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील 179  नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 121 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 62 हजार 274 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 83 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 49 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Pimpri News: शासकीय मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश प्रकिया सुरु

तर, 34 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये (Pimpri Corona Update) दाखल आहे. आज दिवसभरात 3 हजार 123 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 54 हजार 714 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.