Chinchwad News :  पवना नदीच्या स्वच्छतेसाठी ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’  

एमपीसी न्यूज – पवना नदीच्या स्वच्छतेसाठी ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’ राबवण्यात येत आहे. उन्मुक्त युवा संगठन आणि पुण्यातील पुणे प्लॉगर्स या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे स्वच्छता अभियान राबवले जात आहे. शहरात दर रविवारी हे अभियान राबवण्याचा संकल्प युवकांनी केला आहे.

रविवारी (दि.7) झालेल्या ‘प्लॉगिंग ड्राईव्ह’ मध्ये पुणे – पिंपरी चिंचवड मधील 40 युवकांनी सहभाग नोंदवला. या अभियानात प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, निर्माल्य इ. गोष्टी स्वतंत्रपणे गोळा करण्यात आल्या. नदी पात्रात निर्माल्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक आरोग्य निरीक्षक व युवकांनी केली.

_MPC_DIR_MPU_II


अभियान यशस्वी होण्यासाठी प्लॉगमॅन अशी ओळख असणाऱ्या विवेक गौरव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय, ब प्रभाग आरोग्य अधिकारी कुलकर्णी, स्थानिक आरोग्य निरीक्षक चन्नल आणि पर्यवेक्षक गावंडे यांचे सहकार्य मिळाले.

शहरात दर रविवारी  हे अभियान राबविण्याचा संकल्प युवकांनी यावेळी केला. या अभियानात सहभागी आवाहन यावेळी करण्यात आले. या अभियानात सहभाग घेण्यासाठी 9028279861 / 9130232443 या क्रमांकार संपर्क साधता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.