Maval News : गहुंजे येथे दगडाने ठेचून एकाचा निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज – दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली. ही घटना आज (सोमवारी, दि. 8) सकाळी गहुंजे स्टेडियमच्या मागील बाजूला उघडकीस आली. राजेश पाल असे मयत व्यक्तीच्या हातावर नाव गोंदले आहे.

पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, गहुंजे स्टेडियमच्या मागील बाजूला घोरावडेश्वर डोंगराच्या पायथ्याला अज्ञात व्यक्तींनी एका व्यक्तीला दगडाने ठेचून ठार मारले. हा प्रकार रविवारी रात्री घडला असून सोमवारी सकाळी उघडकीस आला.

डोंगराच्या पायथ्याला मॉर्निंग वॉकसाठी जाणा-या नागरिकांना व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी पोलिसांना सकाळी आठ वाजता माहिती दिली. खून झालेल्या व्यक्तीच्या हातावर राजेश पाल असे गोंदलेले आहे. अंगाने सडपातळ असून वय 35 ते 40 वर्ष आहे.

_MPC_DIR_MPU_II

तळेगाव दाभाडे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस तपास करीत आहेत. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटवणे पोलिसांसमोरील पहिले आव्हान आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.