PM Garib Kalyan Anna Yojana : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला चार महिन्यांची मुदतवाढ 

एमपीसी न्यूज – कोरोना काळात केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना पाच किलो गहू – तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने या योजनेला चार महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजून चार महिने या योजनेचा लाभ घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक घेण्यात आली. यामध्ये कृषी कायदे विधेयक रद्द आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनेबाबत निर्णय घेण्यात आले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ दिल्यामुळे डिसेंबर 2021 पासून मार्च 2021 पर्यंत चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज कॅबिनेट बैठकीमध्ये तिन्ही कायदे मागे घेण्यास मंजुरी मिळाली आहे. पुढील आठवड्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात कायदे रद्द करण्याचे विधेयक मांडण्यात येईल. तसेच
क्रिप्टोकरेंसी बाबतही विधेयक या अधिवेशनात सादर केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.