Hindu Janajagruti Samiti : प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ध्वनीप्रदुषणा बाबतीतही पक्षपातीपणा – हिंदु जनजागृती समिती 

एमपीसी न्यूज – ध्वनिप्रदुषणाच्या बाबतीतल्या कायद्यात ठराविक धर्मांना 365 दिवस सूट दिली जात असून केवळ हिंदू धर्मांच्या सणांच्या वेळी ‘प्रदूषण होते’ अशी आवई उठवत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकतर्फी कारवाई करत आहे, असा आरोप करत हिंदू जनजागृती समितीने पुण्यात महाराणा प्रताप उद्यानासमोर शनिवारी (दि.20) दुपारी आंदोलन केले.

 

यावेळी हिंदु जनजागृती समितीचे पराग गोखले, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता निलेश निढाळकर, पुणे जिल्हा वकिल आघाडी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय सावंत,अधिवक्ता सिमा साळुंके, सनातन संस्थेचे चैतन्य तागडे,शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे ऋषीकेष कामठे, ‘राजा शिवछत्रपती परिवार दुर्गसंवर्धन, महाराष्ट्र’चे अध्यक्ष प्रमोद बागुल तसेच हिंदु जनजागृती समिती,सनातन संस्था,हिंदू विधिज्ञ परिषद आदी संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते या आंदोलनात  सहभागी झाले होते.

 

पराग गोखले म्हणाले की, वर्षाच्या 365 दिवस पाचवेळा मशिदींच्या भोंग्याद्वारे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष केले जाते. केवळ दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळी आदी हिंदूंच्या सणांच्या वेळी तसेच हिंदूंच्या सणांना बदनाम करणारे अहवालही प्रसिद्ध करत आहे. हा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धार्मिक पक्षपात असून याद्वारे ‘हिंदूंना कायदा आणि मुसलमानांना फायदा’ अशीच आजची स्थिती आहे. हिंदू हे कदापि सहन करणार नाहीत. मंडळ काय केवळ हिंदूंसाठीच आहे का ? मंडळाची 365 दिवस वाजणार्‍या भोंग्यांबाबत काय भूमिका आहे ? हे मंडळाने स्पष्ट करावे, अशी मागणी ही यावेळी करण्यात आली. तसेच या संदर्भातील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री आणि  मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे गोखले यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.