PIMPRI : पूनम जाधव सौभाग्यवती तर पूजा ढेरंगे ठरल्या सौंदर्यसम्राज्ञी

एमपीसी न्यूज – खान्देश अहिराणी कस्तुरी साहित्य-सांस्कृतिक-कला- क्रीडा मंच पुणे आयोजित मराठमोळी संकल्पना असलेली राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा “महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी”* २०१९ पुणे जिल्हास्तरीय सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेत नारायण गावची  सौभाग्यवती गटात पूनम जाधव तर कुमारी गटात पूजा ढेरंगे प्रथम क्रमांकांच्या मानकरी ठरल्या.

ही स्पर्धा रविवारी आचार्य अत्रे नाट्यगृह पिंपरी येथे झाली. महाराष्ट्राची पारंपारिक वस्त्र संस्कृतीला प्राधान्य देऊन विविध फेऱ्या पार करत व मराठी संगीताच्या तालावर पदक्रमण करत पुणे जिल्ह्यातील युवतींनी विविध फेरीत मराठी बाणा जोपासत सौंदर्यसम्राज्ञीचे व्यासपीठ गाजवले.
मराठमोळी संकल्पना असलेली राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा “महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी” २०१९ अंतर्गत ही सौंदर्य स्पर्धा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश, मराठवाडा आणि कोकण भागातील  जिल्ह्यात आयोजित केली आहे.

ही स्पर्धा आपली मराठी-बोलीभाषांचे संवर्धन आणि साहित्य कला वस्त्र संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा. या मुख्य उद्देशाने आयोजलेली आहे. आयोजक व संकल्पना विजया सुरेश मानमोडे यांची आहे. मानमोडे म्हणाल्या की महिला याच खऱ्या अर्थाने भाषा वाहक आणि संवर्धक आहेत. त्यांच्याच मुळे भाषेत व्यक्त व्हायला आणि आपले सुप्त कलागुणांना सौंदर्य क्षेत्रातही हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञीचे हे व्यासपीठ उभे केलेले आहे.

या स्पर्धेत बाह्यरूपापेक्षा आंतरिक कलागुण, आत्मविश्वास व महाराष्ट्रातील बोलीभाषांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आले आहे. याच गोष्टींचा योग्य वापर करून पुणे जिल्ह्यातील सौंदर्यवतींनी महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी सौंदर्य स्पर्धेचे व्यासपीठ गाजवले. पुणे सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेचे उद्घाटन दीप प्रज्वलन व सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून  करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव, अभिनेत्री कल्याणी चौधरी, चित्रपट निर्माते कैलास वाणी, लेफ्ट. डॉ. जितेंद्र देसले, साहित्यिक राजन लाखे, कार्यकारी निर्माता संतोष साखरे, मृणाल गायकवाड, मिसेस हेरीटेज- मॉडेल मृणाल गायकवाड, तेजस्विनी फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार काळभोर,  कार्यकर्ते विद्या म्हात्रे, आधार फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश कोटीकर, महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी २०१८ विजेत्या डॉ. सारिका सावंत व आयोजिका विजया मानमोडे आदी उपस्थित होते.

अमित गोरखे म्हणाले की, मराठी भाषा संवर्धन व साहित्य, कला, वस्र संस्कृतीचा प्रचार-प्रसाराचे उद्दिष्ट ठेवून आपल्या शहरातील विजया मानमोडे या संपूर्ण महाराष्ट्रात दोन वर्षापासून महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धा राबवित आहेत व त्यात मराठी महिला मुलींना सौंदर्यक्षेत्रात आपल्या कलागुणांचा ठसा उमटविण्याची संधी मिळत आहे. हे कौतुकास्पद आहे. या २०१९ चे सर्व विभागातील जिल्हास्तरीय विजेत्या स्पर्धकांची डिसेंबर महिन्यात “महा अंतिम महाराष्ट्र सौंदर्यसम्राज्ञी २०१९चा भव्य सोहळा होणार आहे तर विजयाताईंनी ती पुणे पिंपरी-चिंचवड शहरातच घेऊन येथील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे.

पुणे जिल्हास्तरीय निवड फेरीच्या ८० स्पर्धकातून  मुख्य स्पर्धेत एकून २८ स्पर्धकांनी सहभाग घेण्याची संधी मिळाली व या सर्व स्पर्धकांनी “परिचय फेरी, गुणकौशल्य फेरी, सुंदर पद्क्रमण असलेली जोडी, तुझी माझी फेरी, आणि बौद्धिक कौशल्य फेरी अशा चारही मराठमोळी फेरी उत्कृष्टपणे पार पाडत प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या.

कुमारी आणि सौभाग्यवती गटातील या पुणे जिल्हास्तरीय सौंदर्यसम्राज्ञी स्पर्धेच्या विजेत्या पुढीलप्रमाणे

सौभाग्यवती गट – प्रथम पुनम जाधव, द्वितीय आश्विनी जानराव, तृतीय डॉ. प्रतीक्षा झगडे, उत्तेजनार्थ – पल्लवी ढोले, विजया आडभाई, निशा परमार, सुर्वणा पालवी, स्वाती एकार

कुमारी गट –  प्रथम – पुजा ढेरंगे, द्वितीय – पियुषा ढोले, तृतीय – रिद्धिषा निकम उत्तेजनार्थ, अंजली खोमणे, गौरी सोनार

खालील पैकी उर्वरीत स्पर्धकांना विशेष शिर्षकांचा मुकुट सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जागृती जावळे, सारिका खाडे,  प्रतीक्षा झगडे, जोगेश्वरी पाटील, प्रियंका अहिरे, कोमल नेटके, सोनाली पानसरे, राधिका श्रीखंडे, माधुरी सुर्वे, अनुजा पाटील, सायली कराडे, प्रमोदिनी, काडगावकर, सेजल येवले.

परीक्षक म्हणून मृणाल गायकवाड, कल्याणी चौधरी व उमेश कोटीकर यांनी काम पाहिले. पुणे सौंदर्यसम्राज्ञी यशस्वी करण्यासाठी सुरेश मानमोडे, वैशाली भगोडीया, दीपा माने, मिनल कडू, अभिजित मानमोडे, गौरव भगोडीया, सौरभ पंडित, वाल्मिक सोनवणे, आभिषेक सुमन, विवेक शिरसाट आणि रोहित मानमोडे, सौरव राठी यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.