Nigdi : गझल मुशा-याला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – बाहेर पाऊस कोसळत असताना सभागृहात ‘वाहवा! क्या बात है!’ , ‘खूप सुंदर’ श्रोत्यांच्या अशा उत्स्फूर्त प्रतिसादात मराठी गझल मुशायरा रंगला. रुद्रंग (पुणे), रवींद्रनाथ ठाकूर सार्वजनिक ग्रंथालय आणि गझलपुष्प यांच्या वतीने निगडी प्राधिकरण येथे आयोजन केले होते.

निगडी प्राधिकरण येथील कदम सभागृहात मराठी गझल मुशायऱ्याचे आयोजन केले होते. यावेळी प्रदीप पाटील, अभय पोकर्णा यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती होती. रंगतदार झालेल्या या मुशायऱ्यात प्रा. तुकाराम पाटील, रघुनाथ पाटील, दिनेश भोसले, प्रशांत पोरे, अभिजित काळे, प्रदीप गांधलीकर आणि संदीप जाधव यांनी विविध विषयांवरील भावभावनांचा आविष्कार करणाऱ्या गझलांचे सादरीकरण केले.

  • मुशायऱ्यापूर्वी, रत्नाकर मतकरी लिखित ‘आरण्यक’ या नाटकाचे संक्षिप्त अभिवाचन करण्यात आले. यामध्ये रमेश वाकनीस, उज्ज्वला केळकर, अशोक अडावदकर, शीतल थिटे आणि नंदकुमार कांबळे यांनी सहभाग घेतला.

नंदकुमार मुरडे, विवेक कुलकर्णी, बी.एस.बनसोडे, नीलेश शेंबेकर, पोपट खारतोडे, गणेश पवार यांनी संयोजनात परिश्रम घेतले. दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.