Pune News : वाघोली मधील वीज पुरवठा अखेर सकाळी सुरळीत

एमपीसी न्यूज – एकामागे एक तांत्रिक बिघाड होत गेल्याने तसेच महापारेषण कंपनीच्या अतिउच्चदाब लोणीकंद उपकेंद्रातील आकस्मिक दुरुस्ती कामामुळे वाघोली (Pune News) मधील सुमारे 9 हजार 500 वीज ग्राहकांचा वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर केलेल्या अथक दुरुस्ती कामानंतर सोमवारी (दि. 27) सकाळी साडे आठ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, वाघोली परिसराला पूर्वरंग 22/22 केव्ही उपकेंद्र द्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. या उपकेंद्राला महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्च दाब उप केंद्रामधून महावितरणच्या पूर्वरंग 22 केव्ही वाहिनीद्वारे वीज पुरवठा केला जातो. मात्र रविवारी (दि. 26) सकाळी 11 वाजताच्या सुमारास पूर्वरंग वीजवाहिनी मध्ये बिघाड झाल्यामुळे पूर्वरंग उपकेंद्राला करोल-2 या वीजवाहिनीद्वारे पर्यायी स्वरुपात ताबडतोब वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

मात्र दुपारनंतर महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्च दाब उपकेंद्रामध्ये तातडीचे आकस्मिक दुरुस्तीचे काम उद्भवले. ते करणे अत्यंत गरजेचे असल्याने सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत या अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या महावितरणच्या वाघेश्वर, संघार व करोला-2 या तिनही 22 केव्ही (Pune News) वाहिन्यांचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर महावितरणच्या तीनही वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. मात्र अर्ध्या तासात वाघेश्वर व करोला-2 या वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला.

Lonavala accident : लोणावळ्यात मोटार सायकलच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू 

दरम्यान महापारेषणच्या आकस्मिक दुरुस्ती कामामुळे सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत वाघोली परिसरातील कमीत कमी ग्राहकांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यासाठी महावितरणकडून (Pune News) पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्यात आली. यामध्ये वाघोली 22 केव्ही वाहिनीवर आकस्मिक दुरुस्ती कामामुळे बंद असलेल्या वीजवाहिन्यांचा भार टाकण्यात आला. मात्र वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी देखील वाढली आहे.

परिणामी नाईलाजास्तव वाघोली परिसरातील आव्हाळवाडी रोड, साई सत्यम पार्क, रेणुका पार्क, दाभाडे वस्ती, बायफ रस्ता, डोमखेल वस्ती या परिसरातील सुमारे 9 हजार 500 ग्राहकांचा वीजपुरवठा महापारेषणच्या आकस्मिक दुरुस्ती कामामुळे सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला. त्यानंतर महावितरणच्या वाघेश्वर व करोला-2 या वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यामुळे तसेच विजेचे भारव्यवस्थापन शक्य नसल्यामुळे या परिसरात रात्री साडे आठ वाजेपासून वीजपुरवठा पुन्हा बंद झाला.

महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर वाघेश्वर व करोला-2 या दोन्ही भूमिगत वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी अथक प्रयत्न केले. जेसीबी व ब्रेकरने खोदकाम करण्यात आले.(Pune News) यामध्ये वाघेश्वर 22 केव्ही वाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी साडे आठ वाजता सर्वच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.