प्रतिभा महाविद्यालयात शारदीय महोत्सव जल्लोषात साजरा

एमपीसी न्यूज –  कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात शारदोत्सवानिमित्त गरबा  नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आले होती. यामध्ये इयत्ता अकरावी व बारावी वर्गानुसार गट पाडण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.

कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागाअंतर्गत प्रा. वर्षा निगाडे व प्रा. चिन्मयी जैन यांच्या पुढाकाराने  व सर्व प्राध्यापकांच्या सहकार्याने ‘गरभा नृत्य स्पर्धा’ अतिशय उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संगीता तरडे, माधुरी निकम आणि प्रा.निजी साजन यांनी काम पाहिले. स्पर्धेत एकूण 11 गटातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले.

PMC Election: पुणे महापालिका निवडणूक कधी होणार?

अनुक्रमे प्रथम क्रमांक – बारावी सायन्स, द्वितीय क्रमांक – बारावी कॉमर्स तर; अकरावी सायन्स ‘अ’ याने तृतीय क्रमांक पटकाविला तसेच; उत्कृष्ट नृत्य जोडी अकरावी कॉमर्स ‘क’ यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे समवेत सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे औपचारिक सूत्रसंचालन प्रा. अर्चना भट्टाचार्य यांनी केले तर; विद्यार्थी व विद्यार्थिनींनी स्पर्धेचे सूत्रसंचालन मनोरंजनात्मक पद्धतीने केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.