PMC Election: पुणे महापालिका निवडणूक कधी होणार?

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका निवडणूक कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गटांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याने निवडणूक दिवसेंदिवस लांबणीवर पडली जात आहे.

निवडणूक जाहीर होत नसल्याने सर्वच राजकीय पक्षांत मरगळ आली आहे.मागील 8 महिन्यापासून पुणे महापालिकेवर प्रशासकीय राज सुरू आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधीना कामे करता येत नाही.

दिवाळीच्या काळात निवडणूक होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र सध्याची राजकीय परिस्थिती बघता पुणे महापालिका निवडणूक नवीन वर्षात होणार असल्याची कुजबुज सुरू आहे. या निवडणुकीसाठी मातब्बर नगरसेवकांनी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे.तर, नव्या दमाचे उमेदवारही रिंगणात उतरणार असल्याचे संकेत आहे.

नुकताच गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव झाला आहे. या काळात माजी नगरसेवक आणि नवीन उमेदवारांनी चांगलीच वर्गणी दिली.आता जनसंपर्क टिकवून ठेवण्यासाठी दिवाळी काळात दिवाळीच्या काळात सरंजाम वाटप करावे लागणार असल्याची माहिती काही नगरसेवकांनी दिली

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.