23.2 C
Pune
शुक्रवार, ऑगस्ट 12, 2022

Pune Crime News : एसीबीचे अधिकारी असल्याचे भासवून अधिकाऱ्याच्या घरात शिरले, पण…

spot_img
spot_img
एमपीसी न्यूज – पुण्यातील कर्वेनगर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून दोघे जण नगर रचना उपसंचालकाच्या घरात ते शिरले. त्यांच्यावर कारवाईचा बहाणा करीत असतानाच अचानक त्याठिकाणी वारजे (Pune Crime News) पोलिस आले. पोलिसांना पाहताच या तोतया अधिकाऱ्यांची बोबडी वळली. तेव्हा महिला पोलीस उपनिरीक्षकांना आम्हाला कल्पना न देता कसे आलात, असे म्हणत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करण्याचा बहाणा करुन हे दोघेही पळून गेले. 

 

 

हा प्रकार कर्वेनगरमधील दत्त दिगंबर कॉलनीत शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता घडला. याप्रकरणी नगर रचना विभागाचे उपसंचालकांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी साध्या वेशातील सावंत व पोलीस गणवेशातील एक पुरुष व महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Pune Crime News : आमदाराचा कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

 

 

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, लाचलुचपत विभाग मुंबईतून आलो असल्याचे सांगून दोघे फिर्यादी यांच्या घरात शिरले. यातील एकाने २३ जून रोजी तुमच्या ऑफिसमध्ये काय झाले याची विचारणा केली. त्यांनी त्यांच्याकडील एक व्हिडिओ दाखवून त्यामध्ये एक इसम झोन दाखल्याबाबत (Pune Crime News) आला होता. त्याबाबत फिर्यादीने आरोपींना माहिती दिली. त्यावर या तोतयाने तुमच्या ऑफिसमधील एकाने झोन दाखल्यासाठी आलेल्याकडे पैशांची मागणी करुन काही रक्कम स्वीकारली. तसेच तुमचे नाव देखील आले आहे. तुम्हाला त्यात अटक करुन तुमची प्रॉपर्टी जप्त करावी लागेल, असे सांगितले. दरम्यान अटक टाळण्यासाठी ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे तो तोतया अधिकार्‍याने त्यांना सांगितले.

 

 

हा सर्व प्रकार सुरू असतानाच वारजे पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक तृप्ती पाटील तेथे पोहचल्या. त्यांना पाहून या तोतयाने तुम्ही आम्हाला कल्पना न देता या ठिकाणी कसे आलात, तुमच्या सिनिअर पी आयचा नंबर द्या, असे त्यांना म्हणाला. त्यांनी नंबर दिल्यावर त्यांना फोन लावण्याचा बहाणा करुन तो घराबाहेर गेला व तेथून तो पळून गेला. वारजे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
spot_img
Latest news
Related news