_MPC_DIR_MPU_III

Chinchwad: पोलीस असल्याची बतावणी करत ते घरात घुसले ; सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी करुन किमंती साहित्याची तोडफोड केली 

Pretending to be police, they broke into the house and stole gold and silver jewelry and vandalized valuables.

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून तीन चार अनोळखी लोक घरात घुसले व त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करुन घरातील लोखंडी कपाट, कचाचे शोकेस कपाट, टिव्ही यांची तोडफोड केली. हि घटना शुक्रवार (दि.21) दत्तनगर, चिंचवड येथे पहाटे तीनच्या सुमारास घडली. 

_MPC_DIR_MPU_IV

याप्रकरणी  सुंदर विलास ओव्हाळ (वय. 48, रा. दत्तनगर, चिंचवड ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी राहुल कांबळे (वय.20, रा. दत्तनगर, चिंचवड ) व त्याच्याबरोबर असलेल्या आणखी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल आणि त्याच्यासोबत असलेले तिघेजण पोलिस असल्याची बतावणी करून पहाटे तीन वाजता फिर्यादी सुंदर ओव्हाळ यांच्या घरात घुसले.

चारी आरोपींनी घरात घुसून फिर्यादी यांच्या अंगावरील सोने चांदी व रोख रक्कम कोयत्याचा धाक दाखवून काढून घेतले. या सर्व वस्तू 1,02,200 रुपयांच्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आरोपींनी हातातील कोयत्याने घरातील लोखंडी कपाट, काचेचे शोकेस कपाट, टिव्ही यांची तोडफोड केली. पिंपरी पोलिसांनी राहुल कांबळे यांच्यासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.