_MPC_DIR_MPU_III

Pune : खासदार अनिल शिरोळे यांच्या साडे चार वर्षांच्या कामाच्या अहवालाचे प्रकाशन 

एमपीसी न्यूज – पुणे शहराचे खासदार अनिल शिरोळे यांच्या साडे चार वर्षांच्या कामाच्या अहवालाचे प्रकाशन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी झाले. यावेळी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, राज्यसभेचे खासदार संजय काकडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे, भीमराव तापकीर, जगदीश मुळीक व शिवाजीनगर मतदार संघाचे स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी अनिल शिरोळे यांनी केंद्रात शहरासाठी केलेल्या कामाचा अभिमान असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. 
_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II
याबरोबरच भाजपच्या वतीने शहरात होत असलेल्या विकासकामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करीत आम्ही काम करतो आहोत त्यावर प्रश्न विचारण्याचा हक्क हा सामान्य जनतेचा आहे इतर पक्षातील राजकारण्यांचा नाही असे सांगत विरोधकांना टोला लगावला. पंधरा वीस वर्षांच्या काळात पुणे शहरात केवळ कागदावर काम झाले आता ते काम आम्ही गेल्या चार वर्षांत ख-या अर्थाने मूर्त स्वरूपात आणत पूर्ण करीत आहोत. येत्या तीन ते चार वर्षांत या कामांचा सकारात्मक परिणाम शहरात दिसून येईल असेही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.