Pune : कोरोना; केंद्रीय पथकाच्या अहवालाकडे पुणेकरांचे लक्ष 

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून,कोरोना बळींनी अर्धशतक गाठले आहे.  या पार्श्वभूमीवर  केंद्रीय पथक पुण्यात दाखल झाले आहे. पुणे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाने कोरोना  प्रतिबंधासाठी काय उपाययोजना केल्या, याचा आढावा या पथकाने घेतला आहे. आता हे पथक कोणता अहवाल देणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. 

 

हे पथक  पुण्यातील वाढत्या कोरोना रुग्णांबाबतचा अहवाल केंद्राला सादर करणार आहे. पुढील 12 दिवस हे पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत पुण्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

 

कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ यामुळे पुण्यातील परिस्थिती अतिधोकादायक बनली आहे. त्यामुळे केंद्रीय पथक या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात दाखल  झाले आहे.   नैसर्गिक आपत्तीच्या वेळीच  असे पथक दाखल होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पुण्यात लॉकडाऊनचे सक्तीने पालन होत नसल्याने हे पथक आले आहे.  पुणे शहर हे कोरोना बॉम्ब ठरत आहे.

 

या पथकाने नुकताच पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात  कोरोनाच्या उपाययोजनांचा  आढावा घेतला. त्यात सोमवारी तब्बल 80 च्या वर कोरोना रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील हा आकडा आता 734 च्या आसपास गेला आहे. मॉर्निंग  वॉल्क आणि  भाजी बाजारात  पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. वारंवार सांगूनही पुण्यातील गर्दी काही कमी होत नाही. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संपूर्ण पुणे शहर सील करण्याचे आदेश दिले.

त्यांनतर पोलिसांनी अधिक कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.  आता केंद्रीय पथक काय अहवाल देणार याकडे लक्ष लागले आहे. पुण्याचा वाढता मृत्यू दर हा चिंताजनक आहे. गेल्या 15 दिवसांत दररोज मृत्यू होत होते. सुदैवाने दोन दिवसांपासून एकही मृत्यू झालेला नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.