Pune : सिंबायोसिस कॉलेज जवळ 10 सिलेंडरचा स्फोट, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यातील विमाननगर भागातील सिंबायोसिस महाविद्यालया (Pune)जवळ आज (बुधवारी) दुपारी 10 सिलेंडर चा स्फोट झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार सदर ठिकाणी 100 सिलेंडर होते त्यातील 10 सिलेंडरचा स्फोट झाला आहे.

IND-SA : के एल राहुलचे शतक: भारताचे पहिल्या डावात 245 धावा

घटनेची माहिती मिळताच 3 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग विझविण्याचे काम सुरू आहे.

पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचत आग अगदी वेळेत विझवल्याने मोठा धोका टळला असून सुदैवाने कोणी जखमी नाही. अग्निशमन दलाचे वाहन पोहोचले तेव्हा ही दोन सिलेंडरचे स्फोट झाले. हे स्फोट एवढे भयंकर होते की सिलेंडर स्फोटा नंतर हवेत तब्ब्ल 100 फूट उंच उडत होते.

लेबर कॅम्प शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये भरत गॅस कंपनीचे हे 100 सिलेंडर होते. अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचल्याने व दुपारची वेळ असल्याने तिथे कामगार नव्हते. त्यामुळे सुदैवाने जखमी वा जिवितहानी टळली असून जर ही घटना राञीच्या वेळी घडली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. परंतू सदर सिलेंडर साठा कोणाचा याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही. सद्यस्थितीत आग विझली असून कुलिंगचे काम सुरू आहे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.