Pune : वाघोली येथे 21 वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला; आरोपीचे नाव, हल्ल्याचे कारण सांगून तरुणाने सोडला जीव

एमपीसी न्यूज : आज सायंकाळी बकोरी रोड (Pune) वाघोली येथे एका 21 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या तरुणाला रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. परंतु, या तरुणाने मृत्यूपूर्वी हा हल्ला प्रेम प्रकरणातून झाला असून आरोपीचे नाव देखील सांगितले. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.  

सदर युवक हा वाघोली येथे बीजीएस कॉलेजच्या बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. येथे तो एका होस्टेलमध्ये राहत होता. त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याला तात्काळ ससून रुग्णालयात नेण्यात आले. त्याला रूग्णालयात घेऊन जाणाऱ्या साक्षीदाराला जखमी अवस्थेत असणाऱ्या तरुणाने  ज्याने त्याच्यावर हल्ला केला त्या आरोपीचे नाव व सदरचा प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याचे कळवले. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. आणि त्याने जीव सोडला.

Chinchwad : महामार्गावरून वेगात प्रवास केल्यानंतर दंडाची पावती आल्यास आश्चर्य नको; जाणून घ्या कारण…

तपासा दरम्यान समोर आलेल्या बाबीनुसार सदरची हत्या ही समलैंगिक संबंधातून झाल्याचा दाट संशय आहे. परंतु, नेमक्या (Pune) कारणाचा पोलीस अजूनही शोध घेत आहेत. जखमी इसमाने सोबतच्या साक्षीदारास दिलेल्या तोकड्या वर्णनावरून आरोपीचे पूर्ण सविस्तर वर्णन मिळवण्यात आले असून आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

लवकरच आरोपी ताब्यात येण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.