Pune : पौड जवळील रावडे गावात 25 मोर आणि रानकोंबड्यांचा मृत्यू


एमपीसी न्यूज-  पौड जवळ रावडे गावाच्या हद्दीतील डोंगरामध्ये सुमारे 20 ते 25 मोर, लांडोर आणि काही रानकोंबड्यांचा मृत्युमुखी झालेल्या अवस्थेत आढळल्या. या घटनेमुळे परिसरातील डोंगरभागात मोठी दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान तीन ते चार दिवसापूर्वी विषबाधेमुळे या पक्षांचा मृत्यू झाला असावा,  असा प्राथमिक अंदाज गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मुळशी तालुक्यातील हा भाग डोंगराळ असून या परिसरात मोर आणि रानकोंबड्या मोठ्या प्रमाणात आढळतात. सध्या हे पक्षी अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत.  सध्या या परिसरातील शेतात ज्वारी, हरभरा, वाटाणा यासारखी पिके घेतली जात आहेत. हे खाण्यासाठी हे पक्षी शेताकडे धाव घेत आहेत. परंतु  शेतात टाकल्या जाणा-या औषधांमुळे आणि खतांमुळे या पक्षांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता गावक-यांनी व्यक्त केली. 

दरम्यान मागील काही दिवसांपासून होणा-या या घटनांकडे वनविभागाच्या अधिका-यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप गावक-यांनी केला.  याबाबत वनविभागाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.