Pune : परदेशातून आलेल्या 27 नागरिकांना घरीच विलग राहण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्रभाग क्रमांक ७ आणि १४ परिसरात परदेशातून आलेल्या 27 नागरिकांची भेट घेउन त्यांना घरीच विलग रहावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

विलगिकरणाच्या १४ दिवसांत कशा प्रकारे दैनंदिनी करावयाची आहे?, स्वतंत्र कपडे, भांडी, तसेच घ्यावयाची काळजी आणि मनपाने केलेल्या सुविधा, आरोग्य तपासणी इत्यादी बाबत माहिती दिली.

या सर्वेक्षणा अंतर्गत २७ व्यक्तींच्या डाव्या हाताच्या पंजावर शिक्के मारण्यात आले. मनपा सहाय्यक आयुक्त किशोरी शिंदे यांच्या नियोजनांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आय. एस. इनामदार, सुनील कांबळे व अन्य कर्मचारी यांचे सहाय्याने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.