Pune : ससूनमध्ये आणखी 3 कोरोना मृत्यू : मृतांची संख्या 46

एमपीसी न्यूज : पुणे शहरात कोरोना मृत्यूंची संख्या वाढत आले. आज ( बुधवारी) ससून रुग्णालयात आणखी तीन कोरोनबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर 3  नव्या रुग्णांनाचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.  त्यामुळे ससूनमधील कोरोना मृत्यूंचा आकडा आता 46 इतका झाला आहे तर शहरात आजपर्यंत एकूण 55 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये हडपसर आणि पार्वती दर्शन येथील दोन पुरुष आणि भवानी पेठेतील एका महिलेचा समावेश आहे.  मृत पुरुषांचे  वय अनुक्रमे 53  आणि 65 होते, ते महिलेचे वय 56  वर्ष होते.  बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे अधिष्ठात्यांकडून मिलेल्या माहितीनुसार आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत ससून रुग्णालयात 137  रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली त्यापैकी तीन रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे ससूनमधील कोरोनाबाळींची संख्या 46 वर पोहोचली आहे.

सध्या ससूनमध्ये ११४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच 60  कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. गंभीर स्थितीतील 2  रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. तर 9  रुग्ण व्हेंटिलेटर शिवाय उपचार घेत आहेत. आज 3  कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे ससूनमधील कोरोना मृत्यूंचा आकडा आता 46 इतका झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.