Pune : शहरात कोरोनाचे 501 नवे रुग्ण; 155 जणांना डिस्चार्ज, 17 जणांचा मृत्यू

501 new patients of corona in the city; 155 discharged, 17 killed

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज, बुधवारी कोरोनाच्या 501 नवीन रुग्णांची नोंद झाली. या आजारातून 155 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनामुळे 17 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 13 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे.

सध्या पुणे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 277 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 56 जण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात कोरोनाचे आता 13 हजार 654 रुग्ण झाले आहेत.

पुण्यातील कोरोनाची ॲ क्टिव्ह रुग्णसंख्या 5 हजार 9 इतकी आहे. आतापर्यंत या रोगामुळे 545 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 8 हजार 100 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

आज कोरोनाच्या 3 हजार 416 चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

धनकवडीतील 53 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, गंज पेठेतील 80 वर्षीय पुरुषाचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये, कोंढव्यातील 29 वर्षीय महिलेचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, तावरे कॉलनीतील 37 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 30 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 60 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तर कोथरूडमधील 45 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढव्यातील 37 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, न्यू रास्ता पेठेतील 51 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 50 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 71 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 63 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, सदाशिव पेठेतील 60 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 64 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, ताडीवाला रोड भागातील 63 वर्षीय महिलेचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 60 वर्षीय पुरुषाचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 78 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.