Pune : इसिसच्या दहशतवाद्यांकडून आयोजित करण्यात आले होते बॉम्ब बनवण्याचे शिबिर

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र इसिस मॉड्यूलप्रकरणी अटक करण्यात (  Pune ) आलेला डॉ. अदनान अली सरकार याचा निकटवर्तीय झुल्फिकार बडोदावाला याने कोथरूडमधून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या मदतीने इतर साथीदारांसाठी बॉम्ब बनविण्याचे शिबिर आयोजित केले होते अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे .

ज्या ठिकाणी बॉम्बचे साहीत्य पूरुन ठेवले होते, त्या ठिकाणाहून केमीकल्स व केमीकल्स पावडर दहशतवादीविरोधी पथकाने (एटीएस) हस्तगत केली आहे. दोन्ही दहशतवाद्यांनी वापरलेले एक चारचाकी वाहन, दोन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे देखील हस्तगत करण्यात एटीएएसला यश आले आहे.

Maharashtra News : अधिवेशन संपताच अजित पवार यांच्याकडून नागरिकांच्या पत्रांवर कार्यवाही सुरू

विविध केमीकल्स, केमीकल पावडर, लॅब इक्युपमेन्टस, थर्मामिटर, पिपेट असे बॉम्ब बनविण्याचे साहीत्य आरोपीकडून जप्त करण्यात आले (  Pune ) आहे. अटक आरोपी व फरार साथीदार आरोपी यांनी पुणे व इतर ठिकाणी रेकी करण्यासाठी वापरलेली एक दुचाकी देखील एटीएसने जप्त केली आहे.

या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात तसेच त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक्स डिव्हायसेसमध्ये मिळालेल्या माहितीद्वारे त्यांचे इसिस या दहशतवादी संघटनेशी असलेले संबंध तपासात निष्पन्न झाले आहेत. अटक आरोपींचा फरार झालेल्या साथीदाराचा, तसेच या आरोपींना फरार असताना मदत करणाऱ्यांचा दहशतवाद विरोधी पथकाकडील विविध पथके कसून तपास (  Pune ) करीत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.