Pune : पुणे विद्यापीठात मुख्य इमारतीमध्ये लागली आग

एमपीसी न्यूज : पुणे विद्यापीठात मुख्य इमारतीमध्ये (Pune) आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या 7 व्या मजल्यावर ध्वजारोहणसाठी असलेल्या सागाच्या लाकडाला आणि जिन्याच्या लाकडाला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अग्निशमन दलाची मदत पोहोचण्यापूर्वी तेथील सिक्युरिटी गार्डने फायर एक्सटीग्यूशर वापरून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दलाची मदत पोहचताच जवानांनी रस्सीचा वापर करून आठ होजची लाईनवर ओढून आगग्रस्त भागावर पाण्याचा एकसारखा मारा करून आग पूर्णपणे विझविली.

Kalewadi : रिक्षा चोरी करणा-या सराईताला अटक, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

घटनास्थळी औंध अग्नीशमन केंद्र अधिकारी कमलेश सनगाळे, ड्रायव्हर अनिल निकाळजे, फायरमन वाजे, स्वप्निल वाघमारे, मोहिते, बुरुड, मदतनीस ओंकार कांबळे, लोहकरे यांनी आग पूर्णपणे विझविली. आगीचे कारण अद्याप समजू शकले (Pune) नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.