Nigdi : निगडीत 1 मेपासून आमदार चषक डे-नाईट क्रिकेट स्पर्धा

एमपीसी न्यूज – विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे (Nigdi) आणि बॉर्न क्रेझी स्पोर्टस् क्लब यांच्या वतीने 1 ते 7 मे 2023 दरम्यान आमदार चषकचे आयोजन करण्यात आले आहे. डे-नाईट क्रिकेट स्पर्धा होणार असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.

निगडी, प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा स्टेडियमवर भव्य राज्यस्तरीय मर्यादित षटकांच्या फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट सामने रंगणार आहेत. पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक 2 लाख 50 हजार रुपये, द्वितीय 1 लाख 50 हजार रुपये, तृतीय आणि चतुर्थ 1 लाख रुपयांचे पारितोषिक असणार आहे. मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजांसाठी आकर्षक बक्षीसे असणार आहेत.

मालिकावीर यांना आकर्षक टू व्हीलर व प्रत्येक दिवसाच्या सामनावीर यांच्यासाठी एक आकर्षक सायकल भेट देण्यात येणार आहे.यात महिला खेळाडूंचा देखील सहभाग असणार आहे.त्याचबरोबर इतर आकर्षक वैयक्तिक बक्षीसे देखील दिली जाणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर  बावनकुळे यांच्या हस्ते समारोप व पारितोषिक वितरण होईल.

Kalewadi : रिक्षा चोरी करणा-या सराईताला अटक, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

सर्व सामने 8 षटकांचे राहतील. एका खेळाडूला एकाच संघातून खेळता (Nigdi) येईल. संघ वेळेत न आल्यास बाद केला जाईल. थ्रो (फेकी) गोलंदाज पूर्ण स्पर्धेतून बाद केला जाईल. स्पर्धेत फेरबदलाचे अधिकार संयोजकांकडे असतील. सर्व सामने वन हाफ राहतील. लॉट्स पद्धतीने सामने खेळविण्यात येतील, अशी माहिती आमदार खापरे यांनी दिली. भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, शैलजा मोरे, सुशांत मोहिते, सतीश कुटे, सत्यन देशमुख, संतोष मुळीक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.