Pune : मांडूळाच्या तस्करीप्रकरणी एकाला अटक; ‘फरासखाना’तपास पथकाची कामगिरी

एमपीसी न्यूज – मांडूळाच्या तस्करीप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने आज पुण्यातील गणेश पेठ येथून एकाला अटक केली. अतिश बाळासाहेब हाके (रा. जांभे, ता.मुळशी, जि. पुणे) असे अटक केल्याचे नाव आहे. यावेळी पोलिसांनी सुमारे 3 लाख रुपये किमतीचे आणि 2.5 किलो वजनाचे मांडूळ जप्त केले आहे, असे फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ काळसकर यांनी सांगितले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फरासखाना तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचारी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना फरासखाना तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर यांना गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम गणेश पेठ या ठिकाणी संशयीतरित्या थांबला आहेत.

हि माहिती मिळताच त्यांनी पथकासह त्या ठिकाणी तात्काळ जाऊन संशयीताला ताब्यात घेतले. यावेळी त्यांचे नाव आणि पत्ता विचारले असता त्याने अतिश बाळासाहेब हाके (रा. जांभे, ता.मुळशी, जि. पुणे) असे सांगितले. त्याकरिता ग्राहक शोधत असताना त्याच्या ताब्यातील पिशवीमध्ये पोलिसांना मांडूळ आढळून आले.

तसेच यावेळी पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मांडूळ विकण्याकरिता आणले होते, असे सांगितले. त्याची किंमत 3 लाख रुपये असून त्याचे वजन 2.5 किलो आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.