Pune : भाजप आमदार, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांच्या विरोधात आचारसंहिताभंगची आम आदमी पक्षाची तक्रार

एमपीसी न्यूज – भाजपच्या विद्यमान आमदार तथा शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचा विरोधात आम आदमी पक्षातर्फे आचारसंहिताभंगची तक्रार करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिसाळ यांनी शक्तीप्रदर्शन करुन रॅली काढली. खासदार गिरीश बापट, माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले यावेळी उपस्थित होते.

निवडणूक कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात सभा घेण्यास बंदी आहे. तरीही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्याच ठिकाणी छोटेखानी सभा घेतली. या सभेत गिरीश बापट आणि माधुरी मिसाळ यांनी मार्गदर्शन केले, असे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.