Pune : वसतिगृह, कॉट बेसिस, पेईंगगेस्ट सुविधा पुरविणाऱ्यांकडून व्यावसायिक दराने मिळकतकर कर आकारणीस ‘आप’चा विरोध

एमपीसी न्यूज – पुण्यात शिक्षण अथवा नोकरीसाठी येणाऱ्या ( Pune) विद्यार्थ्यांसाठी निवासी मिळकतीत वसतिगृह, कॉट बेसिस, पेईंगगेस्ट सुविधा पुरविणाऱ्यांकडून व्यावसायिक दराने मिळकतकर कर आकारणीस ‘आप’ पक्षाने   विरोध दर्शविला आहे. 

पुण्यात शिक्षण अथवा नोकरीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी मिळकतीत वसतिगृह, कॉट बेसिस, पेईंगगेस्ट सुविधा पुरविणाऱ्यांकडून व्यावसायिक दराने मिळकत कर आकारण्यात यावा, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा धोरणात्मक प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे.

हा प्रस्ताव म्हणजे पुण्यात शिक्षण, परीक्षा आणि नोकरी साठी येणाऱ्या लाखो बॅचलर मुलामुलींना मोठा आर्थिक फटका ठरेल. पुणे शिक्षणाचे माहेरघर असून सरकारी परीक्षा तयारीसाठी, शिकण्यासाठी लाखो मुले मुली वर्षभर तर काही तात्पुरत्या काळासाठी कॉट बेसिस, पेईंग गेस्ट, भाडेकरू अश्या स्वरूपात राहतात. त्यांची आर्थिक स्थिती अनुरूप घर घेतात. मुलींच्या बाबतीत सुरक्षेचा प्रश्न म्हणूनही मुली एकत्र राहतात. खानावळ खर्च वाचवण्यासाठीसुद्धा पेईंग गेस्ट म्हणून राहतात. तर अनेक जण रोजगार कमविण्यासाठी शहरात एकटे राहतात. यात मजुरांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे.

69th Sawai Gandharva Bhimsen Music Festival : 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची स्वरमयी क्षणचित्रे

हे सर्वजण मुख्यत्वे अर्थिक दृष्ट्या मध्यम व कनिष्ठ वर्गातील असतात. त्या घराना बिगर निवासी, व्यवसायिक आकारणी केल्यास घरमालक भाडेवाढ करतील व तो बोजा विद्यार्थ्यावर पडेल. बऱ्याचदा कॉलेज ला सुट्ट्या असताना भाडे मिळत नाही. ही सर्व वस्तुस्थिती पाहता या मिळकती बिगर निवासी ठरवून त्यांना व्यवसायिक ठरवणे अयोग्य आहे, असे आप चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.

मनपा मध्ये लोकप्रतिनिधी नसताना असा निर्णय प्रशासनाने घेवू नये. तसेच मोठे थकबाकीदार, सवलतीचा फायदा घेणारे मोठे व्यावसायिक, नोंद न झालेले मिळकतदार, सर्व्हिस अपार्टमेंट देणारे हॉटेल व्यवसायिक, मोठी व्यवसायिक वसतिगृह याबाबत कार्यवाही न करता छोट्या मिळकतदारास वेठीस धरू नये, अशी मागणी पुण्याचे आप पक्षाचे अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, आप पुणे यांनी केली ( Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.