Pune : उडत्या बसच्या घोषणेबद्दल गडकरी म्हणाले…

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती की, पुणेकर नागरिकांना लवकरच हवेतील बसने प्रवास करता येणार. या घोषणेची अनेकांनी खिल्ली उडवली. यावर आता पत्रकारांनी केलेल्या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी उत्तर दिले आहे.

Chinchwad News : बनावट प्रमाणपत्राद्वारे शाळा आणि महापालिका यांची फसवणूक

उडत्या बसचे पुढे काय झाले यावर नितीन गडकरी म्हणाले की, मी घोषणा करणार्‍यांपैकी नाही. कोणती घोषणा केली आणि ती पूर्ण केली नाही ते सांगा. तसेच हवेतील बससाठी पुणे महापालिकेने डीपीआर द्यावा. पुणे महापालिके मार्फत डीपीआर आल्यावर मंजुरी देण्यास तयार असल्याची भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.