Pune News : धन्य मी कृतार्थ माता’ कार्यक्रमात आईंनी दिला आपल्या मुलांच्या कर्तृत्वाला उजाळा

एमपीसी न्यूज – आमच्या मुलांनी कर्तृत्व आणि कष्टाने त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले. आज त्यांची आई म्हणून समाजात मिळत असलेली नवी ओळख आम्हाला सुखावणारी आहे, अशा शब्दांत विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या आपल्या (Pune News) मुलांच्या कर्तृत्वाने धन्य झालेल्या मातांनी आपले मनोगत व्यक्त केले. निमित्त होते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत पुण्यातील हिंदू महिला सभा यांच्या वतीने नवी पेठ येथील एस एम जोशी सभागृह येथे आयोजित धन्य मी कृतार्थ माताया कार्यक्रमाचे.

सुप्रसिद्ध व्याख्याता धनश्री लेले यांची आई माधवी गोखले, ‘मधुराज रेसिपीज्’च्या मधुरा बाचल यांच्या आई कल्पना माळवदे, अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या आई विजया बर्वे, ‘यलो’ चित्रपट फेम गौरी गाडगीळ यांच्या आई स्नेहा गाडगीळ, हुतात्मा विनायक गोरे यांच्या आई अनुराधा गोरे यांच्याशी यावेळी मुलाखतकार शुभांगी दामले यांनी दिलखुलास संवाद साधला. महिला दिनाचे औचित्य साधत या सर्वांचा हिंदु महिला सभेच्या वतीने सन्मान देखील करण्यात आला. सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या.

Pune : उडत्या बसच्या घोषणेबद्दल गडकरी म्हणाले…

“गौरीला स्वत:च्या पायावर उभं करायचं याच विचाराने आम्ही या प्रवासाची सुरुवात केली. तिच्याच जिद्दीच्या जोरावर आज ती इथवर पोहोचू शकली, असे स्नेहा गाडगीळ म्हणाल्या. एकत्र कुटुंबात वाढलेली धनश्री लहानपणापासून पाठांतर आणि वक्तृत्व या दोन्ही गोष्टीत कायम पुढे होती. (Pune News) मी एक आई म्हणून कायम तिच्या पाठीशी उभी राहिले असे माधवी गोखले यांनी सांगितले. लहाणपणी जरा बुजरी असलेली मुक्ता हळूहळू खुलत गेली. आज ती अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून इतरांना आनंद देत आहे याचे समाधान असल्याचे विजया बर्वे यांनी नमूद केले.

वयाच्या 17 व्या वर्षापासून मधुराने नोकरी करीत स्वत:चे शिक्षण तर पूर्ण केलेच शिवाय आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने घराला हातभारही लावला. आज सर्वांना मधुराचा हेवा वाटतो मात्र प्रत्येक रेसिपी करताना ती किमान 8 ते 9 तास उभी असते. ‘मधुराज रेसिपीज्’साठी तिने अपार कष्ट घेतल, (Pune News) असे कल्पना माळवदे यांनी सांगितले. हुतात्मा विनायक गोरे यांच्या आई अनुराधा गोरे या अनेकांना सैन्य भरती, त्या संबंधीच्या परिक्षा  व इतर आवश्यक माहिती, सैनिक होण्यासाठीची प्रेरणा आणि जनजागृती यासाठी कार्यरत आहेत. सुप्रिया दामले यांनी उपस्थितांचे आभार मानले तर वंदना जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.