Eknath Khadse : विधान परिषदेच्या गटनेतेपदी एकनाथ खडसे

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या विधान परिषदेच्या (Eknath Khadse) गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी वर्णी लागल्याची शक्यता वर्तवली जात होती. तसे पत्रही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांना देण्यात आले होते. त्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

Pune News : धन्य मी कृतार्थ माता’ कार्यक्रमात आईंनी दिला आपल्या मुलांच्या कर्तुत्वाला उजाळा

तसेच विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतोदपदी आमदार अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात राजकीय संघर्ष अनेकवेळा जळगावमध्ये पाहायला मिळतो. खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर ते विधानपरिषदेवर आमदार झाले(Eknath Khadse) त्यानंतर आता त्यांच्यावर राष्ट्रवादीने पुन्हा मोठी जबाबदारी दिली आहे. खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव आहे. खडसे यांच्या नियुक्ती करत राष्ट्रवादीने एकप्रकारे भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.